Monday, January 24, 2011

पिज्जा .. महासत्ता .. आणि धोबिघाट

बर्‍याच दिवसानंतर पिक्चर पाहायचा म्हणून काल धोबिघाट ला गेलो होतो..
मोजकेच मित्र होते सोबत..
तसा आर्ट फिल्म पाहण्याचा मझा अनुभव शून्य .. पण तरीही बरा वाटला मला धोबिघाट
पिक्चर बघून झाल्यावर पिझ्झा चापायला गेलेल्या तिघा जणात विषय निघाला तो भारत महासत्ता होईल का, या नेहमीच्या वादाचा ..
नेहमीचा आपला अब्दुल कलाम .. नारायण मूर्ती.. आयटी वगैरे मस्तपैकी बोलून झालं ..
आपलं चित्रपट  जगत कसा वास्तवापासून दूर आहे हेही आम्हाला जाणवलं ..
पण त्या दोघा शहरी मुलांत माझी मतं मात्र भिन्न होत चालली होती...
खरं सांगू..   हे मोठे  मोठे पूल.. रस्ते आणि हे यांत्रिकी करण मला कधीच आवडलं नाही..
माझी विकासाची दृष्टी निगडीत आहे ती.. सामान्य माणसा सोबत... शेतकरी ... मजूर.. यांच्या सोबत....
पोटात पुरेशी भाकर नसताना उन्हा तान्हात काम करणार्‍या गरीबासोबत...
मोठी इमारत उभी करणार्‍या मजुराला रात्र उघड्यावर काढावी लागणार नाही एवढी खात्री असली तरी, माझा भारत महासत्ता झालाय असं मला वाटेल...
विकासाची दिशा कुठे तरी चुकतेय असं वाटतंय .. कारण आपण ज्या इमारती बांधतोय त्याच्या तळाशी गरिबांचे मूलभूत हक्क चिरडले जातायेत...
कुठेतरी संपत्तीची लयलूट चाललीय.. आणि कोणीतरी पैशा पैशा साठी तरस्तोय
पिज्जा अर्धवट उष्टा टाकणार्‍या इंडिया ला भाकरी वाचून उपाशी राहणारा भारत कळेल तरी कसा...?
या वक्यावर आम्ही तिघेही चपापलो ...  कारण सगळी चर्चा तर पिज्जा खात खात च चालली होती ना...
अस्वस्थ.. आम्ही तिघेही.. निमुट पणे निघालो..

खरच.. गरिबांची दु:ख गूगल करून कळत नाहीत ....

2 comments:

  1. किमती रिसोअर्सेस फस्त करून त्या बदल्यात आम्ही समाजाला काही देणार नाही अशी भूमिका असणाऱ्यांवरून महासत्तेची व्याख्या ठरत नाही

    ReplyDelete
  2. विचार शहाण्याचे दिसतात, आणि तेही खऱ्या भारतासाठी डावे नसून उजवे आहेत...

    ReplyDelete

kindly leave a comment... and i will remember you for lifetime.!!!