Monday, April 18, 2011

जन लोकपाल विधेयक ... नक्की आहे तरी काय..

सगळीकडे सुरू असलेला गोंधळ पाहिला की असे वाटते की जणूकाही देशात क्रांती ची वेळ आली आहे. जन्तर मंतर वर रोज जमणारी गर्दी पाहून अण्णा हजारेंची नवी फॅन फॉलोयिंग लक्षात येते ... आणि खास हसू येते ते कोण अण्णा आणि लोकपाल म्हणजे काय हे न समजून घेता हातात मेणबत्त्या घेऊन बाहेर पडणार्या सामान्य माणसाचे ...
जन लोकपाल (public ambudsmen) ही काही नवीन संकल्पना नाहीए.. १९४६ पासून ही मागणी पडून होती..
जन लोकपाल ही अशी व्यवस्था आहे की ज्यात सर्वा सामान्य माणसाला देशाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेल्या भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठावता येईल...
जन लोकपाल हा निवृत्त न्यायमूर्ती (सर्वोच्च न्यायालयाचा) असावा ही सिफारिश आहे.. अथवा असा व्यक्ती जो सरन्यायाधीश होण्यास योग्य असेन ... (या "अथवा" मुळे देशातले कित्येक राजकारणी या पदा चे दावेदार होऊ शकतात) .
लोकापालाच्या काम काजा मधे त्याने चौकशी करणे अपेक्षित आहे पण त्यासाठी कोणती यंत्रणा वापरावी हे स्पष्ट नाही..
शिवाय अण्णा स्वतः ही वादाच्या जंजालात सापडलेले आहेत .. रामदेव बाबा आणि अण्णा मधे उडालेल्या चकमकी सुद्धा लक्षात आहेत लोकांच्या ...
अण्णानि नेमलेल्या समिती मधले लोक सुद्धा निर्दोष नाहीयेत... (भूषण पिता पुत्र)
अण्णा चे आंदोलन कॉंग्रेस नेच सोडलेले पिल्लू आहे असाही मानण्यासारखे पुरावे आहेत..
असा असताना उगाच अण्णा ना गांधी ठरवणे आणि देशात क्रांती आल्याचे वातावरण तयार करणे चुकीचेच नाही का...
विचार करा.. आणि रिप्लाय सुद्धा...