Monday, September 3, 2012

प्रेम.. कधीतरी..

कधी असे तू रम्य सकाळी.. माझया स्वप्णी येऊन जावे..

माझे जगणे धुकाटलेले .. शांत मनोहर निर्मळ व्हावे..




चुकार थेंब ते केसांवरचे.. इंद्रधनूचे रंग बनावे..


काजळ तुझ्या डोळ्यांमधले .. मेघासारखे बरसून जावे..




चिंब भिजावे आपण दोघे.. हातामध्ये हात असावे..


तुझे नि माझे प्रेम तराने .. वार्‍या नेही गात राहावे...




thanks to Vrushali and Harshal