Monday, January 24, 2011

पिज्जा .. महासत्ता .. आणि धोबिघाट

बर्‍याच दिवसानंतर पिक्चर पाहायचा म्हणून काल धोबिघाट ला गेलो होतो..
मोजकेच मित्र होते सोबत..
तसा आर्ट फिल्म पाहण्याचा मझा अनुभव शून्य .. पण तरीही बरा वाटला मला धोबिघाट
पिक्चर बघून झाल्यावर पिझ्झा चापायला गेलेल्या तिघा जणात विषय निघाला तो भारत महासत्ता होईल का, या नेहमीच्या वादाचा ..
नेहमीचा आपला अब्दुल कलाम .. नारायण मूर्ती.. आयटी वगैरे मस्तपैकी बोलून झालं ..
आपलं चित्रपट  जगत कसा वास्तवापासून दूर आहे हेही आम्हाला जाणवलं ..
पण त्या दोघा शहरी मुलांत माझी मतं मात्र भिन्न होत चालली होती...
खरं सांगू..   हे मोठे  मोठे पूल.. रस्ते आणि हे यांत्रिकी करण मला कधीच आवडलं नाही..
माझी विकासाची दृष्टी निगडीत आहे ती.. सामान्य माणसा सोबत... शेतकरी ... मजूर.. यांच्या सोबत....
पोटात पुरेशी भाकर नसताना उन्हा तान्हात काम करणार्‍या गरीबासोबत...
मोठी इमारत उभी करणार्‍या मजुराला रात्र उघड्यावर काढावी लागणार नाही एवढी खात्री असली तरी, माझा भारत महासत्ता झालाय असं मला वाटेल...
विकासाची दिशा कुठे तरी चुकतेय असं वाटतंय .. कारण आपण ज्या इमारती बांधतोय त्याच्या तळाशी गरिबांचे मूलभूत हक्क चिरडले जातायेत...
कुठेतरी संपत्तीची लयलूट चाललीय.. आणि कोणीतरी पैशा पैशा साठी तरस्तोय
पिज्जा अर्धवट उष्टा टाकणार्‍या इंडिया ला भाकरी वाचून उपाशी राहणारा भारत कळेल तरी कसा...?
या वक्यावर आम्ही तिघेही चपापलो ...  कारण सगळी चर्चा तर पिज्जा खात खात च चालली होती ना...
अस्वस्थ.. आम्ही तिघेही.. निमुट पणे निघालो..

खरच.. गरिबांची दु:ख गूगल करून कळत नाहीत ....

काही बाही..

राहू देणा राणी अगं...
थोडाफार ओलावाही..
आता पुन्हा तुझी माझी..
पावसात भेट नाही...


झुलु देत हिंदोळ्यावर...
तुझे माझे वेडे मन...
मिलनाचे ओले क्षण
आता पुन्हा येत नाही...


वेचून घे तूच तुझे...
आठवांचे कवडसे..
मन आता वेडेपिसे..
काही केल्या होत नाही...


राहू देना राणी अगं....

                                                                                                            (कविता बिविता)

Friday, January 21, 2011

असंच काही बाही ...

जे दु:ख आठवावे , विसरून आज झाले ....
माझ्या मनी सुखाची चाहूल का मिळेना ...

तो देश वाळवंटी सोडून आज आलो...
माझया मनातला हा वैशाख का सरेना ...

होते गुलाब काही... माझ्या मनी उमलले ..
काटे च का रुतावे ..
तो गंध का मिळेना....

या शब्द - भावनांचा .. मी खेळ खेळणारा ...
व्हावे असे कसे की....
काही मला कळेना...

                                                                                                                   (कविता बिविता)

मला मदत करा ....

मला खरच मदत करा. मला काहीच सुचत नाहीए...
मी खूप जास्त चिंता करत असेन कदाचित.. पण मला फार अस्वस्थ फील होताय आजकाल ...
मी अस्वस्थ आहे ते माझ्या स्वतःच्या भविष्या बद्दल ...मी काय करू पुढे.. कोणता मार्ग निवडू .. कोठे जाउ हे काहीच ठरलेला नाहीए अजुन ...
माझे जवळचे मित्रा आणि नातेवाईक मला कोणत्या रूपात पुढे पाहु ईच्छितात हे मला जाणून घ्यायचाय ...
तुम्ही मन मोकळे पानने सांगा की मी कसा वाटतो तुम्हाला.. चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सर्वा काही अगदी मन मोकळे पनाने सांगा ...
तुम्हाला ही लिंक मिळाली याचा अर्थ हा अमर जाधव तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात खरच खूप महत्वाच स्थान देतोय ..
याचाच अर्थ तुम्ही त्याला बर्‍याच जवळून ओळखत असणार.... तुम्ही त्याला कसे समजता हे सांगायची आज एक संधी मी तुम्हाला देतोय...
तुमचा काम सोपं व्हावं म्हणून मी तुम्हाला तीन पर्याय देतोय..
तुम्ही.. अमर ला कसा पाहु ईच्छिता ..
एक राजकारणी ..
एक डॉक्टर ...
की
एक साइंटिस्ट ....
अगदीच सोपं हवं असेन तर...
अब्दुल कलाम ...
राज ठाकरे...
की
नीतू मांडके
....
तुम्हाला कोण हवाय माझयातला ....
नक्की लिहा... मी वाट पाहतोय...